Author Topic: तडका - आपल्या विचारांत  (Read 273 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - आपल्या विचारांत
« on: September 21, 2015, 09:08:25 PM »
आपल्या विचारांत

विचारांनी विचार जोडता
जणू वैचारिक उधाण होते
पण विचार कोणते जोडावे
यावर कुणी अजाण राहते

विवेकी विचारांची आपल्या
विचारांनाही संगत द्यावी
अन् अविवेकी काया ही
समाजातुन भंगत जावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता