Author Topic: तडका - दोष  (Read 248 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - दोष
« on: September 25, 2015, 08:46:38 PM »
दोष

कुणी काय करायला हवे,.?
न करणारे सांगत असतात
मात्र इतरांना सांगत असता
स्वत:चे प्रश्न रांगत असतात

निसंकोच सांगावे इतरांना
पण आपले ना राहून जावे
इतरांना दोष देण्याआधी
आपणंच आपले पाहून घ्यावे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता