Author Topic: तडका - नाते आपुलकीचे  (Read 378 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - नाते आपुलकीचे
« on: October 01, 2015, 06:40:19 PM »
नाते आपुलकीचे

आपुलकी अन् प्रेमाची गरज
खरं तर कुणालाही भासते
आपल्या लोकांची आपुलकी
प्रत्येकच मनालाही आसते

कधी नाते जवळचे तर
कधी नाते रापले दिसतात
पण कितीही दुर असले तरीही
आपले ते आपले असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता