Author Topic: तडका - आमची आशा  (Read 271 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,478
तडका - आमची आशा
« on: October 04, 2015, 07:59:13 PM »
आमची आशा

तो गडगडून बोलताच
ती कडकडून चमकली
मुसळधार सरींमधून
वाकडी-तिकडी ठूमकली

तीच्या-त्याच्या परतीची
वाजत-गाजत नशा आहे
नुकसान फक्त टळलं जावं
एवढीच आमची आशा आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता