Author Topic: तडका - शेतकर्‍याचं जीणं  (Read 377 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - शेतकर्‍याचं जीणं
« on: October 05, 2015, 07:44:07 AM »
शेतकर्‍याचं जीणं

पाऊस नाही पडला तर
आत्महत्येनं मरतो आहे
तर पडत्या पावसात कधी
निसर्ग हत्या करतो आहे

का शेतकर्‍यांच्या नशिबी
हे संकटांचंच ठाणं आहे,.?
इकडे आड,तिकडे विहिर
हेच शेतकर्‍याचं जीणं आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता