Author Topic: तडका - आपलं  (Read 350 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - आपलं
« on: October 13, 2015, 07:14:01 PM »
आपलं

आपला तो बाबू आणि
दुसर्‍याचं ते कारटं असतं
कित्तेक मना-मनामध्ये
हे ठरलेलं पार्ट असतं

आपल्याचे आपलेपणही
आपुलकीने ओढले जातात
अन् आपल्याचे दोषही कधी
गुणामध्ये मोडले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता