Author Topic: तडका - अच्छे दिनची चुणूक  (Read 257 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - अच्छे दिनची चुणूक
« on: October 21, 2015, 06:37:27 AM »
अच्छे दिनची चुणूक

खाणं महाग झालंय इथे
जीणं महाग झालं आहे
अच्छे दिनचं वारं सांगा
कुण्या दौर्‍यात गेलं आहे

वेग-वेगळे स्वप्न दाखवून
जनता इथली ठकवली आहे
अच्छे दिन ची चुणूक मात्र
तुर डाळीने दाखवली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता