Author Topic: तडका - प्रिय नेत्यांनो  (Read 330 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - प्रिय नेत्यांनो
« on: October 27, 2015, 07:25:12 PM »
प्रिय नेत्यांनो

नेत्यांच्या वागणूकीने म्हणे
'नेता' शब्द शिवी झालाय
टोप्या घालण्याचा गुणधर्म
जणू नेत्यांची छवी झालाय

अती व्हि.आय.पी. वागणं
आता नेत्यांनी सोडून द्यावं.?
घेतलं कर्जही तत्परतेनंच
वेळो-वेळी फेडून घ्यावं

ज्याने गौरव व्हायला हवा
त्याने मान ना झूकायला हवी
अन् "नेता" शब्दाची लाजही
आता नेत्यांनीच राखायला हवी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता