***** आजची वात्रटिका *****
*****************************
महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरीचे डफडे
जोरजोरात वाजते आहे.
कुस्तीच कुस्तीला
हाताने पाणी पाजते आहे.
अशाने कुस्तीचा किर्ती
लाल मातीला मिळली जाईल !
ड्ब्ल्यु.डब्ल्यु.एफ.सारखी
उद्या कुस्तीही खेळली जाईल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)