Author Topic: राकेश पवारच्या निमित्ताने  (Read 1491 times)

Offline suryakant.dolase

 • Jr. Member
 • **
 • Posts: 190
***** आजची वात्रटिका *****
****************************

राकेश पवारच्या निमित्ताने

त्यांचा दोष एवढाच
ते जन्माने पारधी आहेत.
’ध’ चा ’मा’ करणारे
आमच्यातच गारदी आहेत.

संशयाच्या भूताने
आम्ही पछाडलेलो आहोत.
हा याचाच पूरावा की,
आम्ही पिछाड्लेलो आहोत.

कधी कोंबड्या,कधी बकर्‍या,
कधी रानातील कणसं आहेत !
आम्ही शोधतो निमित्त
विसरतो तीसुद्धा माणसं आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,336
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: राकेश पवारच्या निमित्ताने
« Reply #1 on: December 30, 2009, 08:34:33 PM »
ha rakesh pawar kon ahe ?

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,511
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: राकेश पवारच्या निमित्ताने
« Reply #2 on: December 30, 2009, 08:56:24 PM »
mala he haach prashna padla ahe.

@Suryakant.Dolase sir : Can you put some reference while posting vatratika...so that we can know based on which incident the particular vatratika belongs to.


To reply, look at top right or bottom. You can see Reply  |  Notify  |  Mark unread  |  Send this topic  |  Print

click on REPLY button and post the reply.
« Last Edit: December 30, 2009, 09:14:33 PM by talktoanil »

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 851
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: राकेश पवारच्या निमित्ताने
« Reply #3 on: December 30, 2009, 08:59:14 PM »
ata hila sanga ha rakesh pawar kon ahe.........
tarach tumchi kavita purnahoil

Offline suryakant.dolase

 • Jr. Member
 • **
 • Posts: 190
Re: राकेश पवारच्या निमित्ताने
« Reply #4 on: December 30, 2009, 10:47:08 PM »
राकेश पवार हा १५ वर्षांचा पारधी समाजातील एक मुलगा.
खरे म्हणजे होता.असेच आता म्हणावे लागेल.
वाटमारीच्या प्रकारात तो आहे असा गावकर्यांचा त्याच्यावर संशय होता.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भवानवाडी हे त्याचे गाव.
केवळ संशयावरून त्याला गावकर्यांनी नुकतेच ठेचून मारले.
ज्या दिवशी ’वाटमारी’ चा प्रकार घडला त्या दिवशी राकेश त्याच्या शाळेत हजर होता.

ताजा कलम: या वाटमारी तील खर्य़ा आरोपींना आजच अटक केलीय पोलिसांनी.

गर्जा महाराष्ट्र माझा !! पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो !!+
+
वात्रटिकांचे संदर्भ दिल्याने वात्रटिका समजायला सोपी जाईल,
हे खरे असले तरी मला ते योग्य वाटत नाही.म्हणून मी सोबत तपशिल द्यायचा टाळतो.
वात्रटिकांची त्यामूळे प्रासंगिका होऊन जाते.
याचा अर्थ वात्रटिका वात्रटिका ही प्रासंगिका नसते असा मात्र माझा दावा नाही.
प्रसंगामुळे तर ती कळतेच,मात्र प्रसंग वगळूनही ती ’वात्रटिका’ उरली पाहिजे असा माझा आग्रह असतो.
वात्रटिका ही क्षणिका...प्रासंगिका....’वृत्त’ कविता... ठरावीच त्याहीपेक्षा ती चिरंजिवी ठरावी असे मला नम्रपणे वाटते.
सोबत तपशिल द्यायचा टाळतो.
आपल्या अभिप्रायासाठी आभार.

वाचत रहा...नवा दिवस...नवी वात्रटिका !!

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
« Last Edit: December 30, 2009, 10:49:53 PM by suryakant.dolase »

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,336
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: राकेश पवारच्या निमित्ताने
« Reply #5 on: December 31, 2009, 09:57:20 AM »
aaaaigaaaaaaaaaa  .......... so sad :(

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):