***** आजची वात्रटिका *****
******************************
देशग्रहण
खग्रास ग्रहण लागावे
अशीच देशाची रया आहे.
पांढर्या खादीचीच
देशावरती छाया आहे.
गिळागिळी म्हणजे ग्रहण नाही
ग्रहणाच अर्थ कळतो आहे.
दररोज नवा राहू-केतु
जमेल तेवढे गिळतो आहे.
उघड्या डोळयांनी सारे,
हे ग्रहण बघतो आहोत !
त्यांना नवेनवे वेध लागतात
आपण कुठे जागतो आहोत ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)