Author Topic: विसराळू आणि घसराळू  (Read 980 times)

Offline suryakant.dolase

  • Jr. Member
  • **
  • Posts: 190
विसराळू आणि घसराळू
« on: May 22, 2010, 01:55:03 PM »
***** आजची वात्रटिका *****
******************************

विसराळू आणि घसराळू

राजकारणी कसेही घसरतात
कारण ते घसराळू असतात.
याचे खरे कारण म्हणजे
लोकच विसराळू असतात.

त्यांच्या घसराळूपणाविरूद्ध
लोकांनी रान उठवले पाहिजे !
यासाठी लोकांना मात्र
वेळच्या वेळी आठवले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Marathi Kavita : मराठी कविता