Author Topic: निवडणुकीचा फड  (Read 2419 times)

Offline Mangesh Kocharekar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 95
निवडणुकीचा फड
« on: February 09, 2012, 09:52:38 PM »
निवडणुकीचा रंगलाय फड, आम्हीच जिंकणार म्हनंतात  दादा
पवारांपेक्षा लई बेरकी फोडाफोडीचाच मनी इरादा
पुण्याची जमीन हडपली असा यांच्यावर थेट आरोप
एवढे सगळे फुकट खाऊन यांना बरी लागेल झोप ??
          निवडणूक आम्ही जिंकणार ठामपणे म्हणतात ठाकरे
          निष्ठावन्ताना निरोप पोचलाय फुटतील त्यांना "ठोका रे"
          यांनी म्हणे बोगदे खणलेत जिथे तिथे  पाणीच पाणी
          "करून दाखवले" यासाठी त्यांनी रचलीत नवी गाणी
निवडून द्या मगच पहा  साहेबी साहेबी शैलीत सांगतात "राज"
उमेदवारांच्या  परीक्षा घेऊन निवडणुका कोणी लढते आज ??
हाणामारी फोडाफोडी "खळळ-खटक" का रोज चालेल??
चेहऱ्यावरती डांबर लावून मुंबईचा का प्रश्न सुटेल ??
          आघाडी युती युती आघाडी यांनी का कधी प्रश्न सुटेल ??
          आशा आघाड्या करताकरता प्रत्येकच पक्ष फुटेल
          आज इथे उद्या तिथे हीच आहे रामदासी रीत
          समाजबांधव सुब झूट खास्दार्कीशी यांची प्रीत
कॉंग्रेस म्हणजे "कृपा" नव्हे ओरडून रोज कामत सांगतात
एवढे ज्येष्ठ असूनही श्रेष्ठी कुठे त्यांचे मानतात??
चव्हाणसाहेब  नेते नव्हे चेहऱ्यावरून व्हिलन वाटतात
असंतुष्ट बिल्डर लॉबी त्यांची म्हणे वाट लावतात
         मध्यंतरी राण्यांनी स्वाभिमानाच टाकला गहाण
         एकेकाळी कॉंग्रेसविरुद्ध  त्यांनीच उठवले होते रान
          फुटल्यानंतर कॉंग्रेसने आता त्यांना दिली टांग
          कोकणी माणसानीही त्यांच्या काळजावरती मारला बाण..........                     
                                                                                                   मंगेश कोचरेकर
« Last Edit: March 24, 2012, 09:40:53 PM by Mangesh Kocharekar »

Marathi Kavita : मराठी कविता

निवडणुकीचा फड
« on: February 09, 2012, 09:52:38 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Umesh adkur

  • Guest
Re: निवडणुकीचा फड
« Reply #1 on: February 09, 2012, 11:18:05 PM »
Thakarena kahi mhanu nakos balaka

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):