Author Topic: || लोकशाहीश्वर प्रसन्न ||१||  (Read 1348 times)

एकमेका 'अ'साह्य करू अवघे धरू 'धुडघूस'पंथ
राष्ट्रपती भुवना कडे पाऊले चालती संथ संथ
****
'ममते'ची 'मुलायम' धाक, करी कासावीस काँग्रेसीजना
परी राष्ट्रपती हे प्रणबची  होऊ दे गजरती
'री' ओढा विनविती द्या रे 'त्या' अनुमोदना
****
कलाम कमाल करिती, म्हणती आता पुनश्च होणे नाही राष्ट्रपती ऐका 
तोच सर्वपक्ष अंतर्गत काढीती 'उठा-बशा' घेउनी वरचेवरी 'बैठका'     
'खेळ' ऐसा रंगलासे, दंगलासे असता राजधानीत
हाय रे! कधी होईल राष्ट्रपती भुवन पुनरपि 'सनाथ'

|| श्री लोकशाहीश्वर समर्पणमस्तु ||

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: || लोकशाहीश्वर प्रसन्न ||१||
« Reply #1 on: June 19, 2012, 10:11:53 AM »
sahi re sahi... :)