Author Topic: भ्रष्टाचार !!!  (Read 2666 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
भ्रष्टाचार !!!
« on: May 31, 2015, 01:52:13 PM »
भ्रष्टाचार या मुद्द्यावर निवडणूक त्यांनी लढवली
भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे अशी भाषणे ही ठोकली

निवडून आले अन मंत्रीपदाची खुर्ची ही मिळाली
एके दिवशी त्यांना त्याची अचानक आठवण झाली

भ्रष्टाचार कसा दूर होईल खुप विचार केला
पण भ्रष्टाचार दूर होईल असा मार्ग नाही दिसला

दुसऱ्या दिवशी अधिकार्याची बैठक बोलवण्यात आली
भ्रष्टाचारावर उलटसुलट खुप चर्चा करण्यात आली

बरीच किचकट चर्चा झाल्यावर मंत्रीमहोदय वैतागले
योग्य मार्ग निघत नाही बघुन मनाशीच संतापले

शेवटी  मात्र अधिकाऱ्यांना आश्चर्याचाच बसला दणका
जेव्हा ते म्हणाले "काही देऊन घेऊन हा विषय मिटवता येत नाही का?"
  --- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता