Author Topic: करदाते - कसाई च्या हाती बकरे!  (Read 2353 times)

Offline talktoravi

  • Newbie
  • *
  • Posts: 6
वाचवतील काहो आम्हाला पवार
आणि तारतील काहो आम्हाला ठाकरे
आम्ही करदाते जसे कसाई च्या हाती बकरे !

कोणी इथे वाघ तर कोणी म्हणे छावा
पंजा कुणाचा भारी तर कुणाचा भगवा
कुणी खातो भूखंड तर कुणा खजिना हवा!

गरीब कर देत नाही पण मत मात्र देतो
श्रीमंताचे कडून आमचा पार्टी-फंड येतो
कर देतो मध्यमवर्गी आणि भाषण ऐकून घेतो!

धर्म-जातीचे राजकारण आणि आश्वासंनांची चावी
उघडता दारे सत्तेची खुशाल जनतेची संपत्ती खावी
रुपयाचे काम हजारात होता झाल्याची पावती द्यावी!

वापरा सरकारी यंत्रणा आणि विका देशाची मालमत्ता
राज्य संपले तरी मिळते सौरक्षण गाडी आणि मंत्री भत्ता
हीच आपली प्रगती धीमी, लोकहो ह्यालाच म्हणता सुबत्ता!

रवी जोशी | २० नोव्हेंबर २०१२

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: करदाते - कसाई च्या हाती बकरे!
« Reply #1 on: November 26, 2012, 01:04:43 PM »
japun lihaa jaraa
halli divas nahit bare
kardatyaachyaa nashibaat
fakt shikaar hone.