Author Topic: सासुरवाशीण..!  (Read 2912 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
सासुरवाशीण..!
« on: April 20, 2014, 10:45:49 AM »
लई दिवस ग झाले
आई तुझी आठवण येते,
माघारीपणा पाठवा लवकर,
मी माहेरपणा येते,
*
किती दिवस लोटले,
मी सासरी ग आले,
बरे आहेत न ग बाबा
आठवणी माझ्या डोळा पाणी आले,
*
कशी आहेस ग वाहिनी,
आता नाही माझा तुला त्रास,
खर सांगते ग पण
रोज अडखळतो ग घास,
*
दादा तुझी रे लाडकी,
बहिण आली रे सासरी,
आता नाही रे छळंनर
तुझी लाडकी हि सोनपरी,
*
तुझ्या हाताची ग चव आई,
आता कशी ग मिळणार,
आता माझ्या मागे तुझी,
भुण भुण ग कोण करणार?
*
लेक गेली का एकदा सासरी,
आता माहेरची ग ती पाव्हणी,
आई म्हणेल ग आता,
लेक होती ग माझी गुणी,
*
श्री.प्रकाश साळवी दि. २० एप्रिल २०१४.

Marathi Kavita : मराठी कविता