Author Topic: " झोप "  (Read 13462 times)

Offline talktoravi

  • Newbie
  • *
  • Posts: 6
" झोप "
« on: May 01, 2011, 06:30:45 PM »
उठा! जागे व्हा, उजळून दाही दिशा - प्रगती ची झेप ग्ह्या.
त्या आधी, पांघरूण ओढा, डोळे मिटा, ८ तास झोप ग्ह्या !

खुशाल झोपा 'विकून घोडे', का मोजता किती तास सरत आहेत? 
ऐकण्यात आले, येथे कर्तबगार मंडळी, झोपे आभावी मारत आहेत !!  

काळ स्थळाचे बंधन कसले,  ग्ह्यावा पूर्ण विराम. 
थकल्या जीवास, निखळ, द्यावा झोपेचा आराम !!

ते लोक आहे भाग्यवंत, झोपले विसरून काळज्या अनंत.
काहींच्या नशिबी झोपच नाही, बिघडले ज्यांचे झोपेचे तंत्र!  

रणरणत्या उन्हात, वाळाचे तट्टे - घेऊन येते गार झुळूक. 
गुंगी येते मस्त अशी, आणि मिळते निद्रेचे अगाध सुख!!   

मिळते निद्रेचे अगाध सुख.... zzz...zzz...

रवी जोशी | महाराष्ट्र दिन | ०१ मे २०११


Marathi Kavita : मराठी कविता


bhushan bhuwad

  • Guest
शीघ्रकवी
« Reply #1 on: January 18, 2012, 01:04:08 PM »
     शीघ्रकवी
उगा कविता छदी फन्दि
मला त्यातले कळत नाही
तिला पहिले समोर की
शब्दच मला मिळत नाहीत

कितीदा हुकलो आणिक मुकलो
आनदाच्या मधुर क्षणाला
कशी भावना तिला सांगवी
प्रतिभा सगळी लावली पणाला

कधी अघटित घडत असेही
प्रतिभा मग होतसे दासी
कवितांचा मग नेतो जूडगा
पण मेधा करते काशी काशी

थकलो दमलो विचार केला
लिहून काढल स्वतःला
न शब्द ठेवला उद्या साठी
खर्चला सगळा आत्ताला

कविताच ते जड पूडक
पोहचल बदल्यात तिकीट आला
विचार सूदधा नको म्हणाली
उगा तबल्याच तिरकिट झाल

असा नवरा नको म्हणाली
चहाचे शब्द गटारीसाठी ठेवणारा
मला सापडलाय शीघ्रकवी
पाच मिनिटात न्यूडल्स कविता बनविणारा