Author Topic: " रस्ता "-आनंद गुंडीले- जळते निखारे या काव्य संग्रहातून  (Read 1702 times)

Offline Anand Gundile

  • Newbie
  • *
  • Posts: 19
  • Gender: Male
  • जळते निखारे या काव्य संग्रहातून
    • http://anandgundile@blogspot.com
जळते निखारे या काव्य संग्रहातून

         " रस्ता "

एका गावाच्या रस्त्यासाठी

तीस लाखांचा फंड आला

रस्ता मात्र मुरुमानेच

तीस हजारात पूर्ण झाला

पावसाळ्यात तोच चिखल

आणि तीच तारे वरची कसरत

प्रत्येकानेच चालायचं

हळूहळू घसरत घसरत

या रस्त्याने केला कहर

कुणालाच कळले नाही

रस्त्यावरच गिट्टीच्या हाद्र्याने

गाडीत बाळंत झाली बाई

पण, कुणाला रस्त्याची दुर्दश सांगून

उपयोग झाला न कांही ,

सरपंचाला सांगितले तेव्हा

ते गालातल्या गालात हसले , म्हणाले

दवाखान्याचा खर्च वाचवू

पैसे शाबूत राहतील घरातले

याच रोडवर गाडीत फिरवू

पोटुशी पेशंट गावातले........

                      --आनंद गुंडीले