Author Topic: वर्‍हाडी ठसका क्र.(६)  (Read 5653 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
वर्‍हाडी ठसका क्र.(६)
« on: November 10, 2009, 03:43:16 PM »

 वर्‍हाडी ठसका क्र.(६)
 लग्नाची कहाणी
माह्या बाप म्हणे 'किश्या' बाबू लगन करतं काय
मनात होत हो तर फालतूच नाई म्हणू काय !
न्हावाच्या घरी जाऊन कसा चिकना चोपडा झालो
आरश्यात पाह्यलं तोंड तवा मीच मले भेलो !
बापासंग राजेहो गेलो पोरगी पावले
जो-थो रस्त्यात इचारे पाटील कोणच्या गावाले !
माह्या बाप नेसला फुलपॅंट,मी नेसलो धोतर
बापाकडे पाहून पोरगी म्हणे हे होय का फोतर !
शिंगल्यामधल्या चहाचा बुढ्यानं घोट फुरकून घेतला 
पाह्यता पाह्यता लग्नाचा बराच उडून देला !
लगन झालं थाटामाटात मले कसतरीच वाटे
येणारा जाणारा मले सोडून बायकोलेच भेटे !
सारा गाव म्हणे किश्याले बायको भेटली राणी
मी भरतो तिच्यापुढं रात्रंदिवस पाणी !
म्हणते कशी बाजारातून फेरन लव्हली आनजा
जमत नसन तसं त् दुसरी कोणी पायजा !
गावातले सारे पोट्टे बावा घेतात माही चंगळ
बायको लावते पावडर लाली आणि मी दिसतो ओंघळ !
दिवसभर बायको राजेहो गाव फिरत बसते
थोड्या-थोड्या गोष्टीपायी माह्यावारच रुसते !
लग्नाआधी मी कसा पाह्यजे तिथं फिरो
बायकोपुढं आता बावा मुकाट्यान चरो !
लगन करून मी कसा घाण्याचा बैल झालो
इचार करतो कोण्या बुवा-याच उष्ट पाणी पेलो !
अशी झाली राजेहो माह्या लगनाची कहाणी
माह्यासारखा ह्या आस-यामंधी दुसरा कोणी नाही !

Marathi Kavita : मराठी कविता

Offline aspradhan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 183
  • Gender: Male
  • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: वर्‍हाडी ठसका क्र.(६)
« Reply #1 on: December 10, 2009, 05:37:43 PM »

 वर्‍हाडी ठसका क्र.(६)
 लग्नाची कहाणी
माह्या बाप म्हणे 'किश्या' बाबू लगन करतं काय
मनात होत हो तर फालतूच नाई म्हणू काय !
न्हावाच्या घरी जाऊन कसा चिकना चोपडा झालो
आरश्यात पाह्यलं तोंड तवा मीच मले भेलो !
बापासंग राजेहो गेलो पोरगी पावले
जो-थो रस्त्यात इचारे पाटील कोणच्या गावाले !
माह्या बाप नेसला फुलपॅंट,मी नेसलो धोतर
बापाकडे पाहून पोरगी म्हणे हे होय का फोतर !
शिंगल्यामधल्या चहाचा बुढ्यानं घोट फुरकून घेतला 
पाह्यता पाह्यता लग्नाचा बराच उडून देला !
लगन झालं थाटामाटात मले कसतरीच वाटे
येणारा जाणारा मले सोडून बायकोलेच भेटे !
सारा गाव म्हणे किश्याले बायको भेटली राणी
मी भरतो तिच्यापुढं रात्रंदिवस पाणी !
म्हणते कशी बाजारातून फेरन लव्हली आनजा
जमत नसन तसं त् दुसरी कोणी पायजा !
गावातले सारे पोट्टे बावा घेतात माही चंगळ
बायको लावते पावडर लाली आणि मी दिसतो ओंघळ !
दिवसभर बायको राजेहो गाव फिरत बसते
थोड्या-थोड्या गोष्टीपायी माह्यावारच रुसते !
लग्नाआधी मी कसा पाह्यजे तिथं फिरो
बायकोपुढं आता बावा मुकाट्यान चरो !
लगन करून मी कसा घाण्याचा बैल झालो
इचार करतो कोण्या बुवा-याच उष्ट पाणी पेलो !
अशी झाली राजेहो माह्या लगनाची कहाणी
माह्यासारखा ह्या आस-यामंधी दुसरा कोणी नाही !

   this was very good.aankhi varadhi kaviata vachayala aavdel

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):