Author Topic: (अकरावी मराठीतलं) प्रेम म्हणजे...  (Read 19430 times)

Offline Rohit Dhage

 • Jr. Member
 • **
 • Posts: 221
 • Gender: Male
 • Show me the meaning of being lonely....
***original "प्रेम म्हणजे.." वाचलेली असेल तर कवितेचं "गांभीर्य" लक्षात येईल!!***
पुरे झाले चंद्रसूर्य
पुरे झाल्या तारा
काय करू जेणेकरून
वाहील प्रेमाचा रानवारा

मोरासारखा छाती काढून उभा राहीन
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहीन
कुठे दूर दऱ्याखोऱ्यात
दोघे खोपटे बांधून राहीन

शेवाळलेले शब्द आणिक
यमक छंद करतील काय?
..शब्दांशिवाय दुसरे आणिक
करण्यासारखे आहेच काय

जागा तर आहेच की
येउद्या तर वेळ
अक्षरांच्या भातुकलीचा
ती आली की संपेल खेळ

प्रेम म्हणजे ताक जसं घुसळत जाणं
प्रेम म्हणजे लिंबू होऊन "मिसळा"त जाणं

प्रेम करीन पेट्रोल सारखं
किमतींनी भडकलेलं
आणि एवढं वाढून सुद्धा
टाकीमध्ये ओतलेलं..

शब्दांच्या धुक्यामध्ये अडकणार नाही
election च्या झेंड्यासारखा फडकणार नाही

उधळून देईन तुफान सारं
पानावरती साचलेलं
प्रेम करीन तीरासारखं
काळजामध्ये घुसलेलं

 - कुसुमाग्रज आणि मी :)
« Last Edit: December 08, 2011, 01:39:46 PM by Rohit Dhage »


Offline Vaishali Sakat

 • Jr. Member
 • **
 • Posts: 161
prem karin Tirasarakh

nishigandha

 • Guest
hm kip it up kup sunder ani agdi sajeshir banvliy mala avdli.but prem he ekdach hote ani te  tutle ke apn kai karto swatalac nai kalat  tava jara japun :-* :D ;) :)

sweetsunita

 • Guest
 :)hhhhhhhmmmmmmmmmmmm chan,

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 480
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
छान प्रयत्न

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
छान ..... :)
Rohit...
***original "प्रेम म्हणजे.."....
हि कविता सुद्धा इथे पोस्त कर म्हणजे कवितेचं "गांभीर्य" लक्षात घेता येईल!! :)

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 861
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
haaaaaa ओरिजनल कविता  पोस्ट करा  :)

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 851
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
sundar...
pan milind ne sangitlya pramane original kavitapan post kar..
mhanje doganmadhla ashay nakki kay aahe to kalel....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):