पहाटे पहाटे तुला जाग आली
(कविश्रेष्ट सुरेश भट यांची माफी मागुन ...एक पहाट अशीही…..)
पहाटे पहाटे तुला जाग आली
उभी रात्र सारी घोरण्यात गेली…….!!
तुझे घोरणे ते, मला सोसवेनाकिती घालु कानी,
बोळे ते कळेना असा राहुदे हात, माझ्या कानाशी …!!
म्हणू घोरणे की, फुस्कारने यालाकर्कश बेसुरांची,
जणू पुष्पमालाभिऊनी आलापा, उंदीरे पळाली …!!
जरा तान घे तू, ताण दे घशालामग मच्छरदाणी,
ऑलाउट कशाला ?फुकटात सारी, मच्छरे पळाली …!!
तुला जाग ना ये, मला झोप ना येभगवंत माझा,
कसा अंत पाहेझोपही अताशा, चकनाचूर झाली …!!
-गंगाधर मुटे