Author Topic: सचिनची Bat!!!  (Read 6171 times)

Offline harshad.mokashi

 • Newbie
 • *
 • Posts: 1
सचिनची Bat!!!
« on: October 25, 2013, 04:31:31 PM »
एकदा मी खूपच रुसलो होतो, मन मोडून कोपर्यात बसलो होतो.
होते हातात वही-पुस्तक पण मनात भयंकर राग,
अभ्यास करायची अजिबात इच्छा नव्हती, पण होता बाबांचा धाक.
खरं तर मला चाळीतल्या पोरांसोबत क्रिकेट खेळायचे होते,
Batting करायची होती, सगळे record मोडायचे होते.
मित्र मला बोलवायला घसा फाडून बोंबलत होते.
पण "अभ्यास झल्या शिवाय कुठे हि जायचे नाही"
असे, मासाहेबांनी बजावले होते.
असे माझ्यासोबतच का होते, मेले माझे नशिबाच फुटके,
असे म्हणून स्वतःलाच कोसत होतो,
वाटत होते जगात सर्व सुखी, मी एकटाच शोसत होतो.
त्यात TV वर भारत-पाकिस्तानची match होती रंगात,
`जले पे नमक छीडकना` बहुदा ह्यालाच म्हणतात.
आईला शेवटची विनंती करून पहिली,
"जाऊ दे ना ग आई, आज रात्र भर जागून अभ्यास करीन"
हि युक्ती देखील आज्मौन पहिली.
पण काही उपयोग नाही.
निराश होऊन, हताश होऊन, हलकेच लागलो रडू
पुस्तकातल्या शब्दांच्या लाटांन वरून, माझ्या स्वप्नाच्या समुद्रात लागलो बुडू.
स्वप्नान मधल्या या माझ्या दुनियेत मी नेहमीच खुश असतो.
कधी सचिन सोबत शत्कीय भागीदारी करत असतो,
तर कधी ऑस्ट्रेलियाच्या बोव्लेर्सची कंबर मोडत असतो.
कधी diving catch पकडतो, कधी hattrick घेतो,
तर कधी गावस्कर स्वतःच्या हातांनी मला Man of the Match देतो.
TV वरचा सामना भाई मन लावून बघत होते,
भारत होता विजयाच्या पायरीवर, पण रुसलेल्या नातवाला पाहून ते मात्र हरत होते.
भाई म्हणजे माझे आजोबा.
माझा राद्कुंडा चेहरा पाहून त्यांना चैन पडते का बघा!
आई-बाबांचे लक्ष्य वेधून ते हळूच माझ्या जवळ आले,
"रडू नकोस रे पोरा" म्हणून माझी समजूत काढू लागले.
Chocolate-Cadburry च्या जाळ्यात मी काही यंदा फसणार नव्हतो,
कोणी कितीही सांगितले, तरी मी अभ्यास करणार नव्हतो.
सगळे प्रयत्न जाहल्यावर भैनी एक शेवटची युक्ती मांडली
"परीक्षेत पहिला येउन दाखव, जे मागशील ते देईन"
शोएबच्या ball वर सचिनने सीमारेषाच ओलांडली.
"जे मागीन ते खरच द्याल?"
"होय जे हव ते मिळेल, cycle असो वा नवीन घड्याळ"
भाईंचा प्रस्ताव ऐकून एका क्षणात शांत झाला माझा राग,
आणि हव्या असलेल्या गोष्टीनची डोक्यात लागू लागली रांग.
"अर्रे कसला विचार करतोयस? काय हवाय ते तर संग?"
बास इरादा केला पक्का, पहिला येऊनच दाखवीन,
मनाशी बांधली गाठ.
वार्षिक परीक्षेच्या `Test` साठी घातली `Baggy Hat`
छाती ठोकून म्हणालो,
"पहिला आलो तर मला हवी.......
                                सचिनची Bat!"

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: सचिनची Bat!!!
« Reply #1 on: October 25, 2013, 05:35:19 PM »
Excellent Sir Ji :)