Author Topic: नशिबाची file  (Read 6099 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
नशिबाची file
« on: December 20, 2014, 10:36:55 PM »
नशिबाची file

जन्म मिळावा म्हणून त्या दिवशी मी अर्ज दाखल केला
ब्रम्हदेवाच्या Department ने तो दाखल करुन घेतला

Inward नंबर पडून त्यावर अर्ज पुढे सरकला
Data entry करायला तो आँपरेटर कडे गेला

नशिबाच्या Software मध्ये Data entry झाली
नविनच होता operater त्यात बरीच गफलत झाली

किती टाकावी संकटे-अडचणी गणित थोडेसे चुकले
तपासताना तपासनिसानेही घेतले थोडेसे डूलके

माहीती पूर्ण भरुन झाल्यावर File तयार झाली
माझ्या फाईलसह अनेकांची file print बाहेर आली

Staple करताना शिपायानेही त्याचे "हात" दाखवले
दुसर्याच फाईलचे चौथे Page माझ्या file ला जोडले

अशा रितीने फाईल माझी पूर्ण तयार झाली
"OK checked" शिक्का मारुन ब्रम्हदेवाच्या टेबलावर आली

दुसर्या दिवशी file वर सही होणार होती
नेमकी त्याच दिवशी ब्रम्हदेवाने रजा घेतली होती

Pending पडेल Target ही बाब अधिक्षकाने हेरली
माझ्यासह अनेक file वर त्यानेच सही मारली

त्याच file नुसार आज मी जीवन जगतो आहे
पदोपदी ,आडवळणावर ठोकरा खातो आहे !

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता

नशिबाची file
« on: December 20, 2014, 10:36:55 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Re: नशिबाची file
« Reply #1 on: December 21, 2014, 10:43:51 PM »
मस्त कविता. अभिनंदन.

saddy

  • Guest
Re: नशिबाची file
« Reply #2 on: December 22, 2014, 04:18:52 PM »
sundar....

pingale sandip

  • Guest
Re: नशिबाची file
« Reply #3 on: December 29, 2014, 05:52:54 PM »
this is areal condition of life .i like from bottom of my heart......

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
Re: नशिबाची file
« Reply #4 on: January 02, 2015, 04:39:36 PM »
प्रिय मित्रांनो,
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):