Author Topic: तुझी माझी Love Story..  (Read 9519 times)

Offline Rupesh Naik

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
  • शब्द ओशाळले भाव रेंगाळले....!!शब्द तुझे भाव माझे..!!
तुझी माझी Love Story..
« on: August 09, 2012, 10:23:45 PM »

तुझी माझी Love Story..

............................Rupesh Naik


त्या दिवशी सिनेमागृहात भलताच घडला प्रसंग
सिनेमाच्या पडद्यावर चढला प्रेमाचा रंग ...
स्वर्गातील अप्सरा जणू ती, माझ्याजवळ येऊन हसली
तिचे ते हास्य पाहून माझी दातखीळच बसली ...
मनातील गप्पा सर्व गप्पच झाल्या
पापण्या लावण्याचा कार्यक्रम ठप्पच झाला ..

भुरळ पाडेल मनाला असा तो चेहेरा cute
तिला पाहून मात्र मी तर झालो mute..
भानावर आणत मला ती म्हणाली “oye hello..!!”
तिच्या मैत्रिणीने मागून सूर लावला “how silly fellow..!!”..

त्यांच्या ग्रुपमध्ये माझी sit होती मधली
“तुम्ही please पलीकडे बसता का?” ती अप्सरा वदली ..
नकाराचा मुळी कोठे होता प्रश्न
पुढे जे झाले ते होते माझे स्वप्न ..

स्वर्गलोकी ती अप्सरा मजसमीप येऊन बसली
माझे हावभाव पाहून गालातल्या गालात हसली ..
“पोरगी हसली म्हणजे फसली” माझा funda होता clear
परमेश्वरानेच कदाचित आम्हाला आणले होते near..

पडद्यावर चित्रपट सुरु झाला सर्व श्रोते झाले दंग
परंतु मनाच्या पडद्यावर अमुच्या गुलाबी चढला रंग ..
« Last Edit: August 09, 2012, 10:49:00 PM by Rupesh Naik »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तुझी माझी Love Story..
« Reply #1 on: August 10, 2012, 10:15:53 AM »
मिळाली का तुला हिरोईन तुझी
व्हायच्या आधी पिक्चर चा The End?   
 
का झाला तुझ्या  Love Story चा हि
पिक्चर बरोबरच  The End? 
 
  :( :( :o :( :(
« Last Edit: August 10, 2012, 10:16:21 AM by केदार मेहेंदळे »