नखरेल इम्पोर्टेड smile तुझ,
मॉडर्न आर्ट सारख वाटल,
सांगायच असेल एक तुला ,
मला भलतच काहीतरी वाटल .
नेहमीच तुझा तो भड़क make-up,
माझा पण नुकताच झालेला break-up,
तुझ त्या hi-fi अदांनी,
मूड माझा झाला wake-up.
मित्र म्हणतात तू STD-ISD,
पण local च परवडतो मला,
म्हणुन आता मी दुरूनच ,
नजरेचे SMS पाठवतो तुला .
- शशांक प्रतापवार