Author Topic: पाहतो ते फक्त...  (Read 5335 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
पाहतो ते फक्त...
« on: February 23, 2013, 04:16:29 PM »
आजकाल मी कुणाचेही
चेहरे पाहत नाही
पाहतो ते फक्त पाय
काय म्हणता ?
आदराने !
त्यांच्यात देवत्व पाहून !!
नाही हो !
माझा पाय मुरगळून
तीन महिने झालेत
तेव्हा पासून !
फारच हेवा वाटतो हो ,
मला तुम्हा सर्वांचा
दोन तंदुरुस्त मजबूत पाय
खाड खाड चालणारे
दण दण पळणारे
यात काय सुख असते
ज्याचे पाय मोडतात
त्यांनाच कळते

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
« Last Edit: February 23, 2013, 04:16:57 PM by विक्रांत »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: पाहतो ते फक्त...
« Reply #1 on: February 26, 2013, 12:49:22 PM »
ha ha ha.......
nkkich kuthe tari paul vakad padaly........  :D
« Last Edit: February 26, 2013, 12:49:52 PM by केदार मेहेंदळे »

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: पाहतो ते फक्त...
« Reply #2 on: February 26, 2013, 06:49:34 PM »
 :D :D  पाय बांधलेले आहेत,काय बिशाद आहे .