Author Topic: साहेबाची व्हिजीट  (Read 5504 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
साहेबाची व्हिजीट
« on: June 23, 2013, 06:33:51 PM »
साहेब येणार उद्या दौरयावर
व्हिजिट देणार 
ऑफिसला
काढा जळमट करा झाडलोट
कंपाऊंड गेट
रंगवून घ्या
उचला ढिगारे मातीचे सारे
जुनी अवजारे
लपवा ती
देण्यास सलामी प्यादे युनिफोर्मी
जरी कुचकामी
उभी करा
साबण आणावा संडास रंगवावा
टेबली ठेवावा
पुष्प गुच्छ
नवे पायपोस कपबश्या ग्लास
तत्पर दास
लावा कामी
शेलक्या फायली कामे झालेली 
समोर ठेवली
पाहिजे तया
एकच दिवस सोसायचा त्रास
नंतर उदास
सर्व काही
येतील साहेब जातील साहेब
होतील गायब
पेन्शनात
दरसाली पण येईल फर्मान
करण्या दाटून
सरबराई
जग भित्रयांचे रोजी नि रोटीचे
तयास सत्तेचे
सदा भय

विक्रांत प्रभाकर             
« Last Edit: April 19, 2014, 01:10:40 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: साहेबाची व्हिजीट
« Reply #1 on: June 24, 2013, 11:56:15 AM »
kharay....

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: साहेबाची व्हिजीट
« Reply #2 on: June 24, 2013, 09:36:20 PM »
एकदम ! thanks!

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: साहेबाची व्हिजीट
« Reply #3 on: June 24, 2013, 09:51:17 PM »
साहेब कधीतरी येतात न ऑफिसात
त्यांना बरी   काम दिसाया नकोत ?
म्हणून जीवाचा हा आटापिटा
नंतर  चालायचाच दाम हा खोटा  :(

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: साहेबाची व्हिजीट
« Reply #4 on: June 25, 2013, 01:46:04 PM »
अगदी बरोबर  :( :( :(

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: साहेबाची व्हिजीट
« Reply #5 on: August 17, 2013, 11:20:11 PM »
धन्यवाद मिलिंद ,सुनिता