Author Topic: विनोदी- घरदारदहन  (Read 7752 times)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
विनोदी- घरदारदहन
« on: October 23, 2013, 09:22:14 PM »
[ कविता विनोदी अंगाने लिहली आहे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही. दुखावल्यास क्षमस्व ]

रामायणात तो रामभक्त
हनुमान किती ग्रेट होता
श्रीरामाचा निरोप घेऊन
लंकेत तो सीतेकडे गेला होता

हाच फोर्मुला आज आम्हीही
अवलंबला होता
आणि आमच्या प्रिय मित्रास
आज हनुमान बनवला होता

चिट्ठीरुपी प्रेमसंदेश आमच्या
'बबनसुताकडे' दिला होता
आणि आमचा हा 'अंजलीपुत्र'
धावत-पळत गेला होता

तिकडे तो हनुमान येतांना
लंका जाळून आला होता
आणि आमचा हा हनुमान येतांना 
सगळी लंका आमचं घरदार जाळायला
सोबत घेऊन आला होता

@सतीश भूमकर

 
« Last Edit: October 23, 2013, 09:23:29 PM by सतीश भूमकर »

Marathi Kavita : मराठी कविता


vinod tambe

 • Guest
Re: विनोदी- घरदारदहन
« Reply #1 on: November 03, 2013, 11:36:23 AM »
bhumkar tumchi kavita khup awadali

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
Re: विनोदी- घरदारदहन
« Reply #2 on: November 13, 2013, 10:18:40 PM »
 आभारी आहे तांबे सरकार... ;D