Author Topic: अडाणी फोटोग्राफर  (Read 7388 times)

Offline रवि ढ़माले

  • Newbie
  • *
  • Posts: 8
  • Gender: Male
अडाणी फोटोग्राफर
« on: December 21, 2013, 10:43:50 PM »
चाल ना लवकर शाळेत ये ,
फोन करून तू म्हणाली ।
ग तातडीने गेटवर येताच ,
कार्यक्रमाची रूपरेषा कळाली ।

स्वागताची जय्यत तयारी
गर्दी होत-होती भरभरून ,
ताटामध्ये गुलाबपुष्पे
चार पोरी नटून थटून।

व्यासपीठाच्या आसनावर ,
बसले गावकरी अन नेते ।
"अण्णा" आमचे त्यामध्ये ,
पुरस्कार विजेते।

मेसेज करून तू,
फोटो काढ म्हणालीस …
थोडं पुढे जाऊन ,
जर थांब म्हणालीस ….

विध्यार्थ्यांचा गोंगाट त्यात,
शिक्षक फिरतात अधून -मधून .
खर सांग दीदी ,
फोटो काढू तरी कोठून ।

माहित आहे मला नवी संधी ,
आहे.. नवीन ऑफर…
माहित आहे का तुला मी ,
आहे अडाणी फोटोग्राफर …
 
...…रवि

Marathi Kavita : मराठी कविता


Amita34567

  • Guest
Re: अडाणी फोटोग्राफर
« Reply #1 on: January 31, 2014, 10:38:47 AM »
khatarnak...sahi aahe..keep it up

vj

  • Guest
Re: अडाणी फोटोग्राफर
« Reply #2 on: February 05, 2014, 05:49:25 PM »
ekdam apratim  bhau.........