Author Topic: मोबाईल  (Read 11103 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,266
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
मोबाईल
« on: May 01, 2014, 10:10:12 PM »
आम्हाला तेव्हा, जर मोबाईलची
सोय केली असती !
आम्ही सुद्धा, छान थोडीशी
शायनिंग मारली असती !

मोबाईल हाती, आता आला
मिसकॉल देऊ कुणाला?
म्हणता असं, जरा कुठे
मिसेसचाच कॉल आला !

चार चौघात, चमकावं म्हणून
झकास रिंगटोन ठेवली,
नसलेला कॉल, अटेंड करताना
रिंगटोन आपोआप केकाटली !

लिहावं काही, कीबोर्ड जमेना
मेसेज पाठवायचा कसा?
झालेली पाहून, गंमत आमची
दोस्तांनी घेतला हसा !

काहीही म्हणा, मोबाईल असणं
चांगलीच सोय आहे,
छळ करणारया, लोकांना टाळायला
मस्तच ऑप्शन आहे !© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
Re: मोबाईल
« Reply #1 on: May 27, 2014, 09:29:36 PM »
Durdeva tumch and sudaiv amch