Author Topic: तुज सवे येते मी  (Read 3053 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
तुज सवे येते मी
« on: May 11, 2014, 03:38:47 PM »
सर्व बंध तोडूनी मी
येते रे तुझ्या श्वासासवे
श्वास घेते रे
श्रम तुझे परिहार करते रे
मी येते रे
कुशीत माझ्या रमशी तू
सागर गिरक्या घेशी तू
ना फिक्र तुला कशाची
माझ्या मगर मिठीत रमशी तू
पहुडता तू पलंगावरी
हलकेच तुज झेलते मी
ना कशाची पर्वा तुला
खुशीत हलके हसते मी
निद्रा देवी नाव माझे
श्रम विहार करते सर्वांचे 

श्री प्रकाश साळवी दि ११ मे २०१४.

Marathi Kavita : मराठी कविता


संध्या

  • Guest
Re: तुज सवे येते मी
« Reply #1 on: May 20, 2014, 09:28:05 PM »निद्रा देवी नाव माझे
श्रम विहार करते काहींचे
आळवणी करती उरले मजला
"मगर मिठीत मज तव घेई, बाई
कशास इतकी रुष्ट तू मजवर?"