Author Topic: देव पावला  (Read 1754 times)

देव पावला
« on: November 18, 2014, 02:05:52 PM »
देव पावला

देव पावला नेत्याला
जिंकली त्याने निवडणूक
करू लागला जनतेची
देवाच्या साक्षीने फसवणूक

देव पावला व्यापा-यांना
अन्नधान्याचा दुष्काळ पडला
काळ्या बाजाराचा त्यांचा धंदा
मुळीच नाही कुठे अडला

देव पावला डॉक्टरला
गावात आली मोठी साथ
डॉक्टरची तुंबडी भरली खूप
लोकांची मात्र लागली वाट

देव पावला वकीलाला
एकेक केस खूपच लांबली
आपल्याच अशिलाची अब्रू त्याने
वेशीवरती नेऊन टांगली

देव पावला विद्यार्थ्याला
राजरोस त्याने कॉपी केली
पहिल्या नंबरची बक्षिसे पण
सर्व त्यानेच लुटून नेली

सर्वांना पावून झाल्यावर
बोलावून एकेकाला म्हणाला देव
"तुझे झाले भले आता
माझे कमिशन पुढ्यात ठेव"

Marathi Kavita : मराठी कविता