Author Topic: किडनी ट्रान्स्प्लांट  (Read 1453 times)

किडनी ट्रान्स्प्लांट
« on: December 09, 2014, 07:55:29 PM »
किडनी ट्रान्स्प्लांट
(२ मे १९९९ च्या लोकसत्ता 'किशोरकुंज'मध्यें प्रकाशित)

सिंह पडला आजारी
सुजलं सगळं अंग
खाणं, पिणं बंद झालं
फिका पडला रंग

औषधांना मुळी सुद्धा
मिळत नव्हती दाद
डॉक्टर बोलले "झाल्यात याच्या
दोन्ही किडण्या बाद

आपली  एक किडणी कोणी
याला करील दान
तरच वाचू शकतिल बघा
सिंहाचे या प्राण"

किडणी आपली देण्यासाठी
कुत्रा झाला राजी
पुढे होऊन बोलला "डॉक्टर
घ्या एक किडणी माझी"

सिंहाच्या शरिरामध्यें
कुत्र्याची किडणी बसली
डॉक्टर बोलले "आता याला
चिंता नाही कसली"

जीवन मिळालं सिंहाला पण
एक घोटाळा झाला
कुत्र्याचा एक वाईट गुण
सिंहामध्यें आला

जीवंतपणी आता रोज
तो हजार मरणं मरतो
खांबाजवळ जाताच नकळत
तंगडी वरती करतो


Marathi Kavita : मराठी कविता