Author Topic: या तुम्हाला एक मस्त कविता ऐकवतो  (Read 5245 times)

Offline kaviMahashay

  • Newbie
  • *
  • Posts: 1
या तुम्हाला एक

मस्त कविता ऐकवतो,

शब्दांचे जाळे फेकून

कविता असल्याचे भासवतो


माफ करा कारण

जास्तच घाई होतेय ,

नाही म्हणायला तुम्हाला

मी वेळ नाही देतंय


वेळ नाही लागणार

दोनच मिनिटात होईल ,

हि काय कविता होती ? असा

विचार तुमच्या मनात येयील


काही का असेना पण

तुम्ही छानच म्हणायचे शेवटी ,

थोडेसे हसून सांगायचे की

मस्तच कविता होती


तुमची वाहवा ऐकून मग

मला भलताच हुरूप येयील ,

नवीन कल्पनांना ऊत अन

कवितांचा पूर येयील


हळूहळू मग एकेकाला

गाडीवर लिफ्ट देईन ,

एक कविता संपवूनच

घरा पर्यंत नेईन


बगता बगता माझ्यातला कवी

मोठा साहित्यिक होईल ,

मोठ्या पेपरात लेख अन

लांबलचक भाषणे देईल


परत सांगतो आत्ताची अशी

संधी नंतर मिळणार नाही ,

माझ्यातला कवी महान झाल्यावर

नवनवे श्रोते शोधणार नाही


अजून एक आहे ..   ऐकणार का सांगा

लगेच वाचून दाखवतो ,

या तुम्हाला एक मस्त

छानशी कविता ऐकवतो

                  ......पंकज निलंगेकर