Author Topic: उनाड  (Read 2185 times)

Offline गणेश म. तायडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 195
  • Gender: Male
  • ॥लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी॥
    • ganesh.tayade
उनाड
« on: February 01, 2015, 08:16:39 PM »
डोळे बंद करताना तु नजर येई,
अन् डोळे उघडले की तिसरीच समोर येई...
तुझ्यासाठी मी चंद्र तारे तोडुन आणेल,
तु जर हो म्हणशील तर पहिलीला सोडुन देईन...
तुझा विचार करताना माझ्या मुखात दुसरीचे नाव येई,
तु जर निघून गेलीस तर ती मला भेटायला येई...
रस्त्यावर जेव्हा मी तुझ्या घराचा पत्ता शोधतो,
आईशप्पथ प्रत्येक मुलीकडे वळून वळून पाहतो...
जर तु मला हो म्हटले तर मी संभाळू कित्येकांना,
असे कर नाही म्हणत म्हणत खेळ खेळूया प्रेमाचा...
मी तुमचा पुर्ण दिवसभर सतत विचार करीत असतो,
म्हणजे तुमच्या भेटण्याचा वेळ डायरीत नोंदवत असतो...
चुकून चौघींचा अॅक्सिडंट होऊ नये म्हणून,
मी वेळेचा बरोबर ताळामेळ लावत असतो...
तुमच्या रूपाला पाहिले की माझी गाडी पंचर होई,
अन् तुमच्या विश्वासाने छाती माझी भरून येई...
तुम्हा चौघींमुळे आता झाले माझे जिवन बेकार,
पण जेव्हा तुम्हाला सोडून दिले तेव्हा केला
मला पाचवीने नमस्कार...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com

Marathi Kavita : मराठी कविता