कवी- आपल्या प्रेमीला
जाणू सांग तुला आज काय देऊ
का कायमचे तुझे नाव माझ्या ह्रुदयात लिहू
का सांग तुला पाहिजे ते आकाशातील तारे
तू फक्त बोल तुझ्या समोर ठेवीन मी सारे
का जाऊन त्या आरण्यात तो कस्तूरी मृग आणू
सांग तुला आज काय पाहिजे ते सोनू
जाऊन त्या अथांग सागरात आणू तो मोती
प्रेमाची भेट म्हणून देऊ तुझ्या हाती
सांग तुला सांग पाहिजे काय आज
व्हॅलेंटाईन च्या दिवसी तरी नको होऊ तू नाराज
प्रेमीका .
मेल्या बस कर आता बंद कर थोबाड
माहीत नव्हत मला तू आहेस येवढा लबाड
तुझ्या कवितेला भाळुन मी पडली तुझ्या प्रेमात
तिच मोठी चूक केली मी माझ्या जीवनात
कवितेत वाटतो तू मर्द मराठा गडी
साक्षात तर आहेस तू बिनकाम्या तीडीमीडी
दिवसभर नुसती तू फेकम फेक करतोस
मनात आले ते, काही पण बडबडतोस
नको मला बाबा तुझी साथ खरी
तुझ्या पेक्षा तर तुझी कविताच बरी
सोड मला आता, ना मारणार तुझ्यावर लाइन
नको बाला नको तुझ्यासोबत व्हॅलेंटाईन
संजय बनसोडे