Author Topic: लग्नाचा बार उडेना  (Read 3199 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
लग्नाचा बार उडेना
« on: March 18, 2015, 07:22:53 PM »
हजार पाहिल्या पोरी
याला पसंद पडेना
रंगांनी पाहिजे गोरी म्हणून,
लग्नाचा बार उडेना !

स्वतः काळा जरी
बायको हवी गोरी
स्वतः नकटा जरी
बायको हवी चरचरी

बसून कावळा दारी
कावकाव करत उडेना
रंगांनी पाहिजे गोरी म्हणून,
लग्नाचा बार उडेना !

पोरी बघून थकला तरी
मनासारखी भेटेना
गोरी न भेटे त्याला जरी
काळी मात्र आवडेना

इकुन तीकून भेटली जरी
पत्रिका मात्र जुळेना
रंगांनी पाहिजे गोरी म्हणून,
लग्नाचा बार उडेना !

खाऊन झाला गोलगप्पा
चालताना दिसे म्हातारा आबा
लगीन करीन तर गोरीशीच
पारावर बसून मारे गप्पा

म्हातारा म्हातारी गळायला आली
तरी सुनेचे तोंड दिसेना
रंगांनी पाहिजे गोरी म्हणून,
लग्नाचा बार उडेना !

संजय बनसोडे

Marathi Kavita : मराठी कविता