Author Topic: …बघ माझी आठवण येते का?  (Read 10147 times)

Offline pomadon

  • Jr. Member
  • **
  • Posts: 140
  • Gender: Male
  • प्रमोद पवार...एक मनुष्य प्राणी...
…बघ माझी आठवण येते का?
« on: November 25, 2009, 11:29:50 PM »

 श्री. निलेश गायकवाड यांनी मला पाठवली आहे .
आपल्या समोर प्रस्तुत करीत आहे.

ग्लासभर दारु खिडकीत उभं राहून ढोसुन पहा
…बघ माझी आठवण येते का?
हात लांबव , ग्लासमधे झेल बाटलीतलं पाणी
इवलासा पेग पिऊन टाक
…बघ माझी आठवण येते का?
वा-याने उडणारा बियरचा फेस चेह-यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड ,
गुत्त्यावर ये, तो भरलेला असेलच,
टेबलावर हात ठेवुन बसुन रहा
खुर्ची सरकेल बुडाखाली,
…बघ माझी आठवण येते का?
मग पिऊ लाग, दारुचे अगणित घोट घशात घे
पित रहा चकणा संपेपर्यत,
तो संपणार नाहिच , शेवटी घरी ये
कपडे बदलू नकोस, ग्लास पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये
आता बेवड्यांची वाट बघ,
…बघ माझी आठवण येते का ?
दारावर बेल वाजेल ,
दार उघड, मित्र असेल
त्याच्या हातातली बाटली घे ,
ओपनर तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या झिंगण्याचं कारण,
तू म्हणं ज्युस संपलंय
मग चिअर्स कर,
तूही घे…
तो उठून हिमेश रेशमिया लावेल,
तो तू बंद कर, किशोरचं शराबी लाव,
…बघ माझी आठवण येते का?

Marathi Kavita : मराठी कविता


Offline san

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: …बघ माझी आठवण येते का?
« Reply #1 on: November 27, 2009, 01:13:36 PM »
mazhya manatal bolala