Author Topic: भक्त  (Read 1409 times)

भक्त
« on: April 04, 2015, 04:25:58 PM »
देवा भक्त मी तुमचा परम असे जाणा
नैवद्य आमचा तुम्ही गोड माना

तुमच्याच साठी बळी दिला कोंबडा
रस्सा केला आहे लाल तांबडा

पाय आणि मुंडी तुम्हास वाहतो
बाकीचे आम्ही प्रसाद म्हणुन खातो

देवा तुझा नावाने अंगारा आम्ही देतो
लिबांच्या उताञ्यान रोग बरा होतो

दर्शना तुझ्या भलीमोठी रांग
चार रुपये  टाकून फेडतो तुझे पांग

जागवण्या तुला वाजवतो घंटा
पुजेच्या मानावरून  होतो कधी तंटा

देवा तुला आम्ही करतो नवस
एका नारळात लॉटरीची हौस

तुझ्या वर भक्ती एवढी अपार
तुझ्या नावाचा करतो व्यापार

Marathi Kavita : मराठी कविता