Author Topic: राजा  (Read 1533 times)

राजा
« on: April 17, 2015, 07:33:56 PM »
लोकशाहीत  मी मतदार राजा
एक दिवसाची मजा अन् पाच वर्ष सजा

साहेबांच्यापुढे आमचे लोटांगण
ज्याचे खावे मटण त्याचे दाबावे बटण

साहेबांची भाषणे सभा गाजवणे
आमच्या हाती फक्त टाळ्या वाजवणे

पाच वर्षातून एकदा येतात साहेब
मतदार यादीतून आमचे नाव गायब

परदेशी बँकेत साहेबांची खाती
शाईचा डाग मात्र आमच्या हाती

प्रत्येक कामी साहेबांचे कमिशन
आमच्या नशिबी सडलेले रेशन

जिकडे तिकडे चाले साहेबांचा वशिला
खड्डेयुक्त रस्ते आमच्या राशीला

मतदार मी नावालाच राजा
लोकशाहीत फक्त साहेबांची मजा


 . . . . . . . . धनंजय
Marathi Kavita : मराठी कविता