Author Topic: भारुड  (Read 2045 times)

Offline sanjay limbaji bansode

  • Jr. Member
  • **
  • Posts: 260
भारुड
« on: April 24, 2015, 11:39:16 AM »
- - - - भारुड - - - -

भाणामतीने आणिला खेव
चटकुचे लागे साऱ्या भेव
भुताला रातीचा येई चेव
जाईना किती केला देव देव

यातून ताराया जागा नाही
मार मंतर वैदीन बाई ! !

भाणामती सळसळली
अंगात माझ्या तळमळली
येऊन ह्रुदयात कळकळली
संगती माझ्या सळसळली

तिला जायाला जागा नाही
मार मंतर वैदीन बाई ! !

घरात घुसवला चटकु कुणी
नेले सारे ना ठेविले प्याया पाणी
अवस्था केली भिकाऱ्यावानी
वशिला लावीला माझा धनी

ही चेटकु ना घरातून जाई
मार मंतर वैदीन बाई ! !

अवसं पुनवेला उठ सूठ
घुसे धन्याच्या अंगात भूत
बघून तया लई घाम फूटं
मारली कुण्या दुश्मनान मूठ

या भुताला औषध नाही
मार मंतर वैदीन बाई ! !

खंडोबा मसोबा केल्या देवाच्या वाऱ्या
नवस केला आजु बाजूच्या देवाला साऱ्या
चारही धामाला मारिल्या फेऱ्या
भारून बांधीला गळ्यात बट अन् दोऱ्या

काही फरक पडला नाही
मार मंतर वैदीन बाई ! !


संजय बनसोडे 

9819444028


Marathi Kavita : मराठी कविता