तुला शोधताना दमछाक झाली
पायपीट माझी हकनाक झाली
फिरुन तुझ मागे गात्रे गळाली
परि नोकरी तु मज ना मिळाली
तुजसाठी केला किती अट्टहास
कित्येक पदव्यांची रचली मी रास
नशीबाची साथ कुठे पळाली?
परि नोकरी तु मज ना मिळाली
भरतीसाठी केले अर्जांवर अर्ज
बसच्या टिकीटांचे डोक्यावर कर्ज
पगाराची आस केंव्हाच जळाली
परि नोकरी तु मज ना मिळाली
पोट माझे मी भरणार आहे
धंदा मी आता करणार आहे
कर्जासाठी बॅंकेकडे पावले वळाली
नोकरी तु नायतर नाही मिळाली
. . . . . धनंजय . . . . .