म्हातारपण
अवघे ऐंशी वर्षाचे वयोमान,
लग्न आधी असतो जवान,
कपालावर छपन्न आट्या
मारतो सगळ्याना काट्या
फुटले दोन्ही कान
लावतो सगळ्याना ध्यान
डोळ्यांवर लावतो दोन भिंगांचा चष्मा
दाखवतो बायकांना करिश्मा
डोकिस टक्कल असते
भान वयाचे नसते
काठी वाचुनी कधी ना चालतो
उसनी घेउन एट दाखवतो
काय दिसते ध्यान
म्हणतो मी आहे जवान
सौ . संजीवनी संजय भाटकर