Author Topic: शनी  (Read 1657 times)

Offline nitin bahakar

  • Newbie
  • *
  • Posts: 3
शनी
« on: September 20, 2015, 11:19:26 PM »
  वडिलानी मुलाचं केलेलं कौतुक

              शनी

शब्द अपुरे पडतात
कौतुक तुझे करायला
म्हणून हातांचा उपयोग करतो
तुझ्या कानाखाली मारायला

तुझ्यासारखा मुलगा मिळायला
पुण्य लागते किती
कधी बियर कधी ब्रॅन्डी
त् कधी विस्की असते हाती

तुझ्यापाठीमागे तुला
कित्येक मित्रांची साथ आहे
माझा पैसा गमावण्यामागे
त्या हरामखोरांचा सुद्धा हात आहे

तु आहेस लाखात एक
तूझ्यासारखा नाही दुसरा कुणी
तुझा जन्म झाल्यापासून
माझ्या आयुष्यात आला शनी

कवी-नितीन मनोहर बहाकर
बेलुरा ता.शेगाव
मो.9766006195

Marathi Kavita : मराठी कविता