राजो..दुबईत नोकरी लागली म्हणुन विमानात बसायला भेटलं
पण विमानाच मला लयी भ्याव लागे, पन कोनाले कसं सांगू म्हंटल?
दुबईला जाणार म्हणून म्या नवे कपडे शिवले,
बायकोनं खा साठी गोडधोड केलं अन म्हणते कशी,
का जी, ST सोडुन तुमी इमानानं जायच कबुलच कसं केल?
ST दुबईला जात नाही हे सांगीतलं म्या तिले,
तर म्हणे इतके दिवस शरद पवार काय करत होते सांगा बर मले...
एवढ मोठं विमानतय पाहून मी गेलो भांबावून,
तिथल्या एका भल्या माणसाला माझी किव आली,
त्यांनं सांगीतल मले सारं समजावून,
विमानात बसताना हवाई सुंदरीनं हसुन स्वागत केलं
राजो... त्या पोरीला पाहून माझं मन चल बिचल झालं
विमानाच दार बंद झालं अन घरघर सुरु झाली,
माझ्या छातीत धडकी भरली अन पॅंट ढीली झाली,
मरायच्या भ्येवानं म्या देवाची आराधना सुरु केली, म्हंटल
देवा मला माफ कर म्या विमानात बसायची चुक तर नाही केली?
जवा हवाईसुंदरी हासली माज्याकडं बघून तवा कुठ बर वाटल मले
मंडली,तिच्याकडं पाहून मला वाटलं कुठ तरी पाणि मुरते,
अन ति माझ्याकड बघून मनातल्या मनात झुरते....
ति सगळ्यांकडेच पाहून हसायला लागली तवा राग आला मले,
अन हसायच असेल तर एकाकडं पाहून हास असं सांगुन टाकलं तिले...
Ok..ok करत ती निघुन गेली,
म्या म्हंटलं ok..ok करतीये हिला ओकारी तर नसल आली...
ती परत आली तवा तिच्या हातात होती थाली,
मला वाटलं मला ओवाळायला पंचारती तर नसल घेऊन आली,
मला नव्हत माहीत मी एवढा साजरा दिसत असल
अन अप्सरे सारखी पोरगी माझ्यावर मरत असलं
विमानाच्या तिकीटाला लयी पैशे लागले,
पन मज्जा तशीच आली,
विमानात माज्याशी हवाईसुंदरी कशी गुल्लुगुल्लु बोलू लागली,
मी न मागता ति माज्यासाठी चहा,कॉफी, नाष्टा घेऊन येऊ लागली,
म्या म्हंटल देवा अशी साजरी बायको मला कौ नाही रे दिली?
मंडली बायकोची आठवण आल्यावर अंगावर येतॊ काटा
अन माजं चुकिच्या मुहुर्तावर लगन लागलय असंच वाटे आता..
विमानात किती मज्जा असते हे भित भित म्या सांगीतलं बायकोले...
अन येवढी साजरी दुबईची नोकरी तिनं सोडायला लावली राव मले....