सलमान करतो ती स्टाईल
त्याने चड्डी घातली काय
नि तो उघडा फिरला काय
कुणीच काय बी बोलायचं नाय
सलमान हाय भाय त्यो सलमान हाय
बोलायचं काय बी काम नाय ॥
जिथं तिथं असतो त्याचाच बोलबाला
इथं कोण इचारतंय आम्हाला
साधं कुत्रं ओळखत नाय साला ॥
मी पण एकदा अंगावरती
नाव कोरलं सल्लू
शर्ट काढूनि फेकून दिलं
नि बाहेर पडलो हल्लू ॥
वाटलं कोणतरी आयटम साली
बोललं हन्नी हन्नी
बोलताक्षणी फिरवू तिला गल्लीबोळी वन्नी
च्यामायला फिरून चटकून गाव हुंगलं
नाय भेटली कुणी मन्नी , मला नाय भेटली मन्नी ॥
चकरा मारून चक्कर आली
बसलो झाडाला टेकून
तेरे नामची गाणी म्हटली
माझी खबर घरात गेली ॥
बाप माझा शोधात हाय
हे सांगत आला टिल्लू
धरणीकंप त्यो झाल्यावानी
जमीन लागली डुल्लु
अंगावरचं सल्लू जाउनी
लिहून घेतलं म्या " पिल्लू "
दादा, लिहून घेतलं म्या " पिल्लू " ॥
सिद्धेश्वर विलास पाटणकर C