आज काल देव सुद्धा वरदान,
सुलभ हफ्त्यामध्येच देतो,
त्याच्या प्रत्येक तथास्तु नंतर,
* कन्डीशन अप्लाय असतो.
भक्त घोर तपश्चर्या करतो,
मग देव प्रकट होतो,
काय हवे ते माग म्हणुन,
दोनपैकी एक बोट निवडायला सांगतो.
भक्त नाराज होउन म्हणतो,
देवा तुला काय झालय,
देव म्हणतो "मी तोच आहे पण",
स्वर्गाच management चेन्ज झालय.
- शशांक प्रतापवार