Author Topic: मी कविता करायला लागलो  (Read 4880 times)

Offline futsal25

 • Newbie
 • *
 • Posts: 46
 • Gender: Male
  • माझ्या काही कविता (My few poems)
मी कविता करायला लागलो
« on: August 30, 2010, 12:57:05 PM »
कधी कधी मीही लिहायला लागलो
चार-दोन ऒळी खर्डायला लागलो
इकडून-तिकडून, ऒढुन-ताणून
शब्द मांडुन, यमक जोडायला लागलो
आणि त्याला, कविता म्हणायला लागलो
मीही कविता करायला लागलो

कुठल्याही विषयावर काव्य करु लागलो
नाही मिळाला, तर शोधायला लागलो
चारदोघांना, हळूच ऎकवायला लागलो
कविता करतो, अभिमानाने सांगायला लागलो

थोडी दाढी वाढवून, अस्ताव्यस्त केस
स्वत:च्याच तंद्रित रहायला लागलो
मोरोपंत, कुसुमाग्रज, विंदा, अशी नावे
एकाच दमात घ्यायला लागलो

घोळक्यात बिनदिक्कत कविता म्हणून
कोणाला आवडो वा न आवडो
आपली मते मांडायला लागलो
मधेच जडबंबाळ शब्द वापरायला लागलो

कधी कधी मीही लिहायला लागलो
चार-दोन ऒळी खर्डायला लागलो

- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)  ;)  ;D  :DMarathi Kavita : मराठी कविता


Offline paragakluj

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: मी कविता करायला लागलो
« Reply #1 on: September 02, 2010, 06:33:08 AM »
खरडता खरडता कधी झाली कविता हे नाही तुम्हाला कळले,
शोधत बसला शब्द सग्लिकडे  यमक मात्र अपोआप जुळले ....
....
छान खरडपट्टी केलिय  :D :D :D :D...keep it up

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: मी कविता करायला लागलो
« Reply #2 on: September 06, 2010, 11:56:35 AM »
mazya babtit hi agadi asech ghdale re :D .............. chhan ahe kavita ................ likhan mast ahe tuze ............ keep writing and keep posting :) .........

कधी कधी मीही लिहायला लागलो
चार-दोन ऒळी खर्डायला लागलो
इकडून-तिकडून, ऒढुन-ताणून
शब्द मांडुन, यमक जोडायला लागलो
आणि त्याला, कविता म्हणायला लागलो
मीही कविता करायला लागलो

कुठल्याही विषयावर काव्य करु लागलो
नाही मिळाला, तर शोधायला लागलो
चारदोघांना, हळूच ऎकवायला लागलो
कविता करतो, अभिमानाने सांगायला लागलो