Author Topic: पुणे तिथ काय उणे …..  (Read 11931 times)

Offline pran_kavi_007

 • Newbie
 • *
 • Posts: 5
पुणे तिथ काय उणे …..
« on: September 03, 2010, 07:38:28 PM »
पुणे तिथ काय उणे …..
आहो  आपण म्हणतो पुणे तिथ काय उणे …..बरोबर आहे ........

इथ जागेंचे भाव झालेत १००० X कित्तिक पट गुणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

चौपाटी नसताना महाग झाले “Z Bridge” चे चणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

भर-रस्त्यात इथ खून मारामारी दंगा जाहीरपणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

इथ आईटी न वाढलय प्रमाण पार्टी, मग त्यात आले पिणे
अणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे 

जागेचा प्रश्न,पाण्याचा प्रश्न,त्वरित कामपूर्ति साठी मग मलई खाणे
अणि आपल एकच पुणे तिथे काय उणे

मोकळी जागा विकायची म्हणाल की हजर पवार किंवा राणे
अणि आपल एकच पुणे तिथे काय उणे
एकमेकांच्या गरजा अफाट , त्याने झाले महाग खिशातले आणे
आणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे     

इथ परप्रांतीय येउन मराठी माणसा-साठी मोठा खड्डा खणे
आणि आपण म्हणतोय पुणे तिथे काय उणे

अहो इथे कुणाल (पार्क) जवळचे  व्यापारी विकतील मोहरी सांगुन धणे
आणि आपल काय तर पुणे तिथे काय उणे 

मटका गांजा रेव-पार्टी यांना पोलिसच  करतात मदत उघडपणे
आणि आपल काय तर पुणे तिथे काय उणे

इथ   संस्कृति,शिक्षण आणि हुशारीचा चुराडा होतोय अगदी शांतपणे
अणि आपण अजुनही म्हणतोय पुणे तिथ काय उणे

पण काही असो इथल्या मातीत रंगते  पंडित भीमसेन जोशी चे गाणे
अणि म्हणूनच की काय पुणे तिथे काय उणे

अत्यंत साध्या पण भेदक शब्दात आहे  संदीप,सलील चे लिहिणे/गाणे 
आणि म्हणूनच की काय पुणे तिथे काय उणे

काय सांगू मित्रांनो काहीही झाले तरी कवी प्रणव चे  तर पक्के आहे  इथेच रहाणे
शेवटी  एक महत्वाचे ........ पुणे तिथे खरच काय उणे !!!!!!!!!

कवी - प्रणव कुलकर्णी
(भिलवडी) जिल्हा -सांगली, महाराष्ट्र (सध्या मुक्काम पुणे )

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,511
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: पुणे तिथ काय उणे …..
« Reply #1 on: September 04, 2010, 12:08:56 AM »
ha ha..sahi ahe...and true fact :)

Offline ghodekarbharati

 • Jr. Member
 • **
 • Posts: 120
Re: पुणे तिथ काय उणे …..
« Reply #2 on: September 07, 2010, 02:18:45 PM »
sahi!

Offline sachin gadilkar

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: पुणे तिथ काय उणे …..
« Reply #3 on: September 13, 2010, 07:02:29 PM »
Apratim Pune Thithe Kay Une.

From
SACHIN A. GADILAR

Offline Deepti Khandekar

 • Newbie
 • *
 • Posts: 8
Re: पुणे तिथ काय उणे …..
« Reply #4 on: September 14, 2010, 07:47:34 PM »
aplya sarakhya kavinche sarth ahe jine....

Offline justsahil

 • Jr. Member
 • **
 • Posts: 50
 • Gender: Male
Re: पुणे तिथ काय उणे …..
« Reply #5 on: September 15, 2010, 01:41:40 AM »
अगदी पुणेरी पुणेकर.......

Offline futsal25

 • Newbie
 • *
 • Posts: 45
 • Gender: Male
  • माझ्या काही कविता (My few poems)
Re: पुणे तिथ काय उणे …..
« Reply #6 on: September 18, 2010, 01:14:19 AM »
wa wa waa kavi Pranav, aasech kavita lihine chalu rahu de
mast, aavdali  :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D
 :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D

Offline aspradhan

 • Jr. Member
 • **
 • Posts: 183
 • Gender: Male
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: पुणे तिथ काय उणे …..
« Reply #7 on: November 08, 2010, 10:01:26 PM »
Manava  lagel tumhala. kay chhan ahe agadi APRATIIM.

Offline amolnikam

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: पुणे तिथ काय उणे …..
« Reply #8 on: November 09, 2010, 10:16:40 AM »
gavakadlya bhashet 1 nambar bhava.............. ;D

Offline mukeshbele

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: पुणे तिथ काय उणे …..
« Reply #9 on: November 09, 2010, 01:31:00 PM »
Mitra khup chan , mitra todlas,chabuk ;D

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):